Breaking

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती व कृतिकार्यक्रम सादरीकरण कार्यशाळा, आमटेम पेण 2 NOV 2018

जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड


समावेशित शिक्षण अंतर्गत
दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती व कृतिकार्यक्रम सादरीकरण कार्यशाळा
रा जि प शाळा आमटेम, ता. पेण
दिनांक:- 02 नोव्हेंबर 2018

*प्रेरणास्रोत*
          मा. अभयजी यावलकर साहेब (IAS)              
मुख्य कार्यकारी अधिकारी  
                  रायगड जिल्हा रिषद, अलिबाग

  मा. सुभाषजी महाजन 
प्राचार्य
डाएट पनवेल जि. रायगड

मा. डॉ. भरत पवार
ज्येष्ठ अधिव्याख्याता
DIECPD पनवेल
* प्रमुख उपस्थिती *
मा. डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता DIECPD पनवेल
श्री. भरत वेखंडे, IED जिल्हा समन्वयक , DIECPD पनवेल
श्री. रविंद्र विशे, IED जिल्हा समन्वयक , DIECPD पनवेल
श्रीम. मनिषा खैरे, विषय सहाय्यक , DIECPD पनवेल
श्री. गणेश कुताळ, विषय सहाय्यक , DIECPD पनवेल
श्री. राकेश अहिरे, विषय सहाय्यक , DIECPD पनवेल
श्री. हेमकांत गोयजी, विषय सहाय्यक , DIECPD पनवेल
श्री. भरत वेखंडे, IED जिल्हा समन्वयक , DIECPD पनवेल
श्री. रविंद्र विशे, IED जिल्हा समन्वयक , DIECPD पनवेल
श्रीम. मनिषा खैरे, विषय सहाय्यक , DIECPD पनवेल
श्री. गणेश कुताळ, विषय सहाय्यक , DIECPD पनवेल
श्री. राकेश अहिरे, विषय सहाय्यक , DIECPD पनवेल
श्री. हेमकांत गोयजी, विषय सहाय्यक , DIECPD पनवेल
साधनव्यक्ती cwsn ३० पैकी २३, रिसोर्स टीचर ३१ पैकी २५  


 दिव्यांग विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर जि. रायगड जाणून घेण्यासाठी  दिव्यांग विद्यार्थी अध्ययन स्तर  येथे क्लिक करा.



                           
   कार्यशाळेचे व्यवस्थापन व संयोजन
                                                      सर्व IED टीम, पं.स. पेण

v प्रास्ताविक
ü सर्वच दिव्यांग विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करणे आवश्यक 
ü अध्ययन स्तर निश्चितीमुळे आपल्याला कामाचा आरंभ बिंदू गवसेल.
ü प्रत्येक दिव्यांग मूलांत शिकण्याची क्षमता असते असा आत्मविश्वास शिक्षकांपर्यत आपण पोहचवायला हवे.
ü दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी गरजे नुसार संधी व वेळ देणे आवश्यक 
ü 16 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे.
ü समता व समानता संकल्पना समजून घेणे आवश्यक.
ü विद्यार्थ्यांची गरज,क्षमता,आवड विचारात घेवून अध्यापन
ü दिव्यांग मूल समजून घेणे आवश्यक 
ü अध्ययन स्तर निश्चिती व कृतिकार्यक्रमाचे सादरीकरण करावे.
आदी मुद्द्यांवर श्री.रविंद्र विशे, IED जिल्हा समन्वयक यांनी विस्तृत विवेचन केले.

v तालुकानिहाय कृतिकार्यक्रमाचे सादरीकरण :
         पोलादपूर तालुका वगळता 14 तालुक्यातील IED टीम ने अध्ययन स्तर निश्चिती व त्या आधारित कृतिकार्यक्रमाचे सादरीकरण केले. त्यातील 
खालापूर -  दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती केली व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रकार निहाय संपादणूकीचे विश्लेषण केले._
सुधागड -  इयत्तानिहाय अध्ययन स्तर निश्चितीचे विश्लेषण केले. त्या आधारित कृतिकार्यक्रम तयार केलाय. त्यात कृती व साहित्यासहित अध्ययन अनुभव देण्याची योजना तयार केलेली दिसली._
म्हसळा -  अध्ययन स्तर निश्चिती केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना आलेल्या शिकण्यातील अडचणी त्यावरील उपाययोजना आणि अध्ययन अनुभव दिल्या नंतर दिसून आलेली प्रगती याचे संश्लेषणात्मक विवेचन केले._
मुरुड -   दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रकारनिहाय अध्ययन स्तर निश्चिती करून माहितीचे विश्लेषण केले. विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यासाठी कृतिकार्यक्रम तयार केला._
श्रीवर्धन -  संपादणूक निम्न स्तर व उच्च स्तरावर असण्याचे कारणे सांगून त्यावरील उपाययोजना सुचविले.
अशा प्रकारे खालापूर,  सुधागड, म्हसळा, श्रीवर्धन व मुरुड गटांचे उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण केले.

v मार्गदर्शन :
ü डेटा ड्रिव्हन काम केले तर मूलं शिकतील.
ü शिक्षकाचे मित्र बनून आपण विद्यार्थ्यां पर्यंत पोहचलं पाहिजे.
ü मूल्यांकनानुसार मागे असलेल्या मुलांना विशेष अनुभव देण्याची गरज
ü साधनव्यक्ती cwsn व रिसोर्स टीचर यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यातील मिडियेटर (दुवा) बनून काम करावे.
ü अध्ययन शैलीनुसार इयत्ता व विषय निहाय प्रश्नपेढी विकसीत करावी.
ü CRG गटातील सदस्य म्हणून आपल्या CRG कार्यक्षेत्रात येणाऱ्या आव्हानानुसार  अध्ययन अनुभव मिळवून देण्यासाठी स्वतःचे कार्यविवरण प्राधान्य क्रमानुसार आराखडा तयार करावे.
ü १००% cwsn ची अध्ययन स्तर निश्चिती व त्यानुसार १००% विद्यार्थी कृतीआराखडा नोव्हेंबर २०१८ अखेर पूर्ण करणे व दिलेल्या लिंकमध्ये माहिती अद्ययावत करणे.
आदी मुद्द्यांवर श्री. भरत वेखंडे, IED जिल्हा समन्वयक यांनी विस्तृत निवेदन केले.

v अध्ययन निष्पत्ती विषयी मार्गदर्शन :
ü अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?
ü अध्ययन निष्पत्तीचे महत्त्व 
ü अध्ययन निष्पत्ती आधारित दिव्यांग विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे आवश्यक 
ü अध्ययन निष्पत्ती व सरल चा डेटा याचे विश्लेषण
ü अक्षर गट पद्धतीने वाचन विकास गतीने होतो.
आदी मुद्द्यांवर श्री. हेमकांत गोयजी,विषय सहाय्यक DIECPD पनवेल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

v प्रेरणादायी मार्गदर्शन :
ü अध्ययन स्तर निश्चितीमुळे आपले ध्येय समजले.
ü मुले शिकतो करण्यासाठी साहित्य व कृतीचा उपयोग करावा.
ü समस्या सोडविण्यासाठी चाकोरीबाहेर जाणे आवश्यक
ü प्रश्न आहे म्हणजे त्याचे उत्तरही असतेच त्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.
ü दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नावाने शाळेचे अपयश दाखवणारी प्रवृत्ती बदलली पाहिजे. 
ü प्रत्येक मूल शिकू शकतं हा विचार रूजणं आवश्यक.
ü मूल शिकण्यासाठी समतेचे तत्व अंगिकारले पाहिजे.
आदी मुद्द्यांवर डॉ.दिनेश चौधरी, अधिव्याख्याता यांनी प्रेरणादायी व सविस्तर मार्गदर्शन केले.


v शब्दाकंनः श्री. हेमकांत लक्ष्मण गोयजी, विषय सहाय्यक DIECPD पनवेल



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.