जिल्हा शैक्षणिक
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल,
जि. रायगड
मा.नंदकुमार साहेब,प्रधान सचिव, शालेय
शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांची
संवाद कार्यशाळा
स्थळ: डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लाई
शैक्षणिक संकुल, नवीन पनवेल
दिनांक: 28 एप्रिल 2018 वेळ: सकाळी 11 ते 4:15
*प्रमुख उपस्थिती*
मा. नंदकुमार साहेब,
प्रधान सचिव,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र
शासन
मा. सुनिल मगर,
संचालक,
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे.
मा.जगन्नाथ भोर,
अतिरीक्त मु.का.अ.
रा.जि. प.अलिबाग
*कार्यवृत्तान्त*
® प्रास्ताविक : मा. सुभाष महाजन, प्राचार्य,
DIECPD पनवेल, जि. रायगड.
® निवेदक :
डॉ.
दिनेश चौधरी, अधिव्याख्याता,
DIECPD पनवेल, जि. रायगड.
® मा. सुनिल मगर साहेब,संचालक MAA पुणे यांनी 1 :35 मिनिटाच्या भाषणात मार्गदर्शन करताना खालील
मुद्द्यावर आपले विचार मांडले.
Ø माहितीचे
विश्लेषण
NAS, असर, PSM या सर्वेक्षणात सातारा,राज्य
यांच्या तुलनेत रायगड जिल्हा कुठे आहे ? रायगड जिल्ह्यातील कोणता तालुका पुढे आहे
? कोणता तालुका मागे आहे ? याचे विश्लेषण केले.
त्यानुसार रायगड जिल्ह्याने आपल्या कामाची दिशा ठरवावी.असेही निर्देशित केले. सातारा
हा जिल्हा राज्यात सर्वात पुढे आहे. सातारा जिल्ह्याला बेंचमार्क ठेवण्यापेक्षा सातारा
जिल्ह्याच्या पुढे जाण्याचे उद्दिष्ट ठेवले तर सातारा पेक्षा वेगळे काम दाखविता येईल.
अन्यथा सातारा पुढे निघून जाईल.
KRA नुसार रायगड जिल्ह्यात किती शिक्षक अँप तयार करतात ? वेबसाईट
तयार करतात ? ज्ञानरचनावादी शाळा किती आहेत ? किती शाळा प्रगत आहेत? अशा विविध प्रकारच्या
उद्दिष्टे निहाय माहितीचे विश्लेषण केले.
Ø
·
KRA (key result Area) ची उद्दिष्टये
मा. मुख्यमंत्र्यांनी
18 KRA दिलेले आहेत. त्याची पूर्तता करण्यात काही अंशी आपणास यश आले आहे. पण अजून आम्हास
काम करायला हवे.
·
100% शाळा डिजिटल करणे
आपण
100% शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपण अनेक शाळा डिजिटल केल्या आहेत.
आपला पॅटर्न केंद्र सरकारने स्वीकारला आहे.
·
learning outcome साठी काम करणे
शासनाने
learning outcome चे साहित्य पुरविले आहे.
त्याबाबतीत पालकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करावी. व त्याच्या प्राप्तीसाठी
काम करावे. ज्यायोगे मूल शिकू शकेल.
· NEET व
JEE च्या धर्तीवर दहावीचा बदललेला अभ्यासक्रम
यावर्षी
दहावीचा अभ्यासक्रम बदललेला असून किती जणांनी पाहिला ? असा प्रतिप्रश्न केला.आपली पिढी
सक्षम पिढी व्हावी या उद्देशाने पाठयक्रम तयार केला आहे.
· दहावीची
मूल्यांकन पद्धती बदलली आहे
पाठ्यपुस्तकाचे
बदललेले स्वरूप व त्या अनुषंगाने मूल्यांकन पध्दतीत सुद्धा आमूलाग्र बदल केला आहे.
त्यातून गुणवत्ता युक्त पिढी तयार होईल.
· इ कंटेंट
तयार करणार
1 ली ते
10 वी च्या मुलांना शैक्षणिक व्हिडिओ, ऑडिओ
असे साहित्य अँप च्या माध्यमातून उपलब्ध करून देणार. मित्रा अँप च्या वरचे व्हर्जन
आलेले दिशा नावाचे अँप विकसित करणार. शिक्षकांनी स्वतः साहित्य तयार करावे. व या अँप
वर आपले साहित्य प्रसिद्ध करावे. त्याचा उपयोग सर्वाना होईल.
· स्वच्छतेचा
संस्कार
आपल्या
देशातील 1000 मुले दरदिवशी डायरिया होऊन मृत्युमुखी पडतात. आपल्या मुलांना स्वच्छतेचा
संदेश अथवा संस्कार केल्यास 1000 मुलांचा जीव आपण वाचवू शकू. यासाठी फ्री hand
wash स्टेशन तयार करावे.
· राज्यात
बायोमेट्रिक पद्धत लागू होणार
HRD मंत्रालयाच्या
सूचनेनुसार राज्यात बायोमेट्रिक पद्धतीचा उपयोग करून विद्यार्थी व शिक्षक यांची उपस्थिती
नोंदली जाणार. त्यासाठी नवे अँप तयार करणार.
® मा. नंदकुमार साहेब,प्रधान सचिव यांचे प्रेरणादायी
विचार
मा.साहेबांनी 1 तास 49 मिनिटे 57 सेकंदाच्या मार्गदर्शनात विविध प्रकारच्या
मुद्द्यांना स्पर्श केला. व सर्वाना कामाची दिशा दिली.
v सुखात
आहात का सर्व ? मूलं सुखात आहेत का ?
मुलांना वाचता येत नाही, मग मुलं
कशी सुखात असणार ? रायगड हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग च्या शेजारी असून देखील रायगड शैक्षणिक दृष्टीने
समृद्ध नाही. कदाचित रायगडची समस्या व अडचण वेगळी असू शकेल.
v टप्पे
जास्त केले म्हणजे यश मिळतेच असे नाही.
मूल्यमापन प्रामाणिकपणे केले तर
? किंवा करता आले तर ? या दोन्ही पैकी काम केले तरच यश मिळते.
v वाचन व
समजपूर्वक वाचन
वाचन व समजपूर्वक वाचन यात फरक
आहे. वाचता येणे म्हणजे समजपूर्वक वाचन हा अनेकांचा समज आहे. अक्षर ,शब्द ओळखता आले
म्हणजे वाचन म्हणावे का ? लिहिलेले मजकूराचा अर्थ जाणून घेण्याची प्रक्रिया म्हणजे
वाचन होय. यात विरामचिन्ह ओळखून मजकूर वाचता येणे आवश्यक आहे.
v वाचन कशासाठी
शिकावे
लिहिलेला मजकूर अर्थ समजून घेण्यासाठी
असतो. ही प्रक्रिया जन्मभर चालते. वाक्याला अर्थ असतो. वाक्यात स्वल्पविराम आला की
अर्थ बदलतो. उदा: दिनकर
दिन म्हणजे दिवस , दीन
म्हणजे गरीब, यात आघात चुकला तर अर्थ बदलतो.
स्वल्पविराम बदलला तर काय होईल.?
रुको मत जाओ.
रुको, मत जाओ
(थांब) रुको मत, जाओ (थांबू नको)
अक्षर पद्धतीने शिकलेले परीक्षेपूरते वाचतात. नंतर वाचत नाहीत.
अक्षर पद्धतीने शिकवित असल्याने मुले वाचन करीत नाही. *आम्ही नाही का शिकलो अक्षर पद्धतीने ?* असा समज
प्रत्येकाचा आहे. त्यात बदल होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक मुले ज्ञानाची निर्मिती
करतात.
v एक सुद्धा
केंद्रातील मुले तुमची 100 % वाचत नाहीत. काय कारणे असावीत ?
केंद्र मागे असण्याची DIECPD च्या
प्राचार्यांनी जरा वेगळी कारणे सांगितली आहेत. पण मूल न शिकण्याची, तुमच्यापैकी कोणाच्या
डोक्यातली कारणे संपली आहेत का ?
Ø Ded
,bed च्या अभ्यासक्रम मध्ये मुले न शिकण्याची कारणे कोणती ? किंवा परीक्षेत तुम्ही कोणती कारणे सांगितलीत
?
1)
आदिवासी मूल
आदिवासी मुलं शिकत नाही. आदिवासी
हा कितीही शिकला तरी आदिवासी राहणार. आदिवासी म्हणजे काय ? मानवी जगात सुरुवाती पासून
रहिवास करणारा. या मुद्द्यांचा मुळाशी जाऊन विचार करू. इथे कोणी आदीवासी आहे का ? इथे आदिवासी असलेल्यानी
हात वर करा.इथे बसलेले काही आदिवासी आहेत.
ते शिकलेले आहेत. मग आदिवासी मुले शिकत नाही हा भंपक विचार आहे. ती ही मुले शिकू शकतात.
अधिकारी बनू शकतात. आदिवासी मूल शिकू शकत नाही हा चुकीचा विचार आहे.
2)
मुली शिकत नाही.
इथे बसलेले अनेक महिला शिकलेले आहेत. यावरून मुली शिकत
नाही हा खोटा व चुकीचा विचार आहे.
3)
शिक्षकांची भीती
किती खरं बोललात ? शिक्षकाची भीती
का वाटेल ? मूल समजून घेतले तर मूल शिकेल.
4)
पालकांचे अज्ञान.
एकदम मूर्ख माणसाला रडता येत नाही
का ?. हसता येते का ?राग येईल का ? त्याला
सर्व येईल. केवळ त्याला ययाती समजणार नाही, ज्ञानेश्वरी समजणार नाही.
पण या विचाराच्या सुरुवातीला जाऊ. प्रत्येक शाळेत शिकत असलेल्या मुलाचे पालक शिकलेले
असेल का ? इथे बसलेल्या प्रत्येक शिकलेल्या
व्यक्तीचे पालक शिकलेले होते का ? जर त्यांचे पालक शिकलेले नसतील तर हा मुद्दा इथेच
संपला. मुलाचा पालक शिकलेला नसला तरीही मूलं शिकू शकतात.
5)
पालकांचे स्थलांतर
कुटुंब स्थलांतरित का होते ? उदरनिर्वाह
साठी स्थलांतरित होते. आईवडील कामावर जाणार व मुले शाळेत शिकणार. ते पालक मुलांना घेऊन
जाणार नाहीत. मग चर्चा कसली करता ? हे स्पष्टीकरण
अनेक उपस्थिताना पटले नाही. यावर अधिक खोल विचार केला गेला. यासाठी उपस्थितांना प्रश्न
विचारला की,
आईवडीलाशिवाय मूलं थांबू शकत नाही
का ? मग तुमची मूल या सातव्या माळ्यावर का
नाही आली सोबत.? या जिल्ह्यात एक सुद्धा व्यक्ती
नाही, जे मुलाला सोडून कामावर निघून गेले.? तुमच्यापैकी किती जण आहेत ? ज्यांनी मुलाला
शाळेत थांबवून घेतले. व मुलाला शिकते केले. यावर एका केंद्रप्रमुखानी न्हावे आदिवासी
वाडीतील 25 मुलांपैकी 12 विद्यार्थ्यांना शाळेत स्थलांतरित होण्यापासून वाचविता आले. असा अनुभव सांगितला
ü स्थलांतरित
मुलाबद्दल विचार करण्याची तुमची विचार शक्ती
तुमच्या विचार करण्याच्या शक्तीवर
अवलंबून आहे. तुम्ही जितका विचार कराल तितकी मुले शाळेत टिकतील.
ü स्थलांतरित
म्हणजे अनियमित मुले.
रायगड जिल्ह्यात 5% मुले अनियमित
आहेत. याचाच अर्थ ती मुले शाळेत आली नाही ना ?
ü रायगड
मधील 68% मुले वाचतात
95 % मुले नियमित आहेत. नियमित मुलांपैकी
68% मुले वाचन करीत आहेत. व 48% मुले भागाकार करीत आहेत.याचाच अर्थ असा की 95% नियमित
मुलांपैकी 27% मुले वाचन करीत नाही. 47% मुले भागाकार करीत नाहीत. यामागची कारणे काय
? याचा शोध घेऊ या. याच्या मुळाशी जाऊ या.
ü बॉटम
10 केंद्र असण्याची कारणे
१) 100% मूलभूत
वाचन क्षमता विकास कार्यक्रम व 100% संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया क्षमता विकास
कार्यक्रमातील अध्यापन तंत्र व साहित्याच्या सातत्यपूर्ण उपयोगाचा अभाव.
२) सुसंवादाचा
अभाव
३) मूलनिहाय
कृतिकार्यक्रमाचे अभाव.
वरील कारणे DIECPD च्या प्राचार्यांनी सांगितली आहेत. अजून
काय कारणे असावीत ?
ü शिक्षकाची
मानसिकता
तुम्ही शिक्षक असताना किती मुले
100 % शिकली ? जर तुम्ही शिक्षक असताना
100 % शिकली नाहीत मग तुमची मानसिकता योग्य होती का ? यात शिक्षकांना दोष नाही देता येणार. यावरून शिक्षकाची मानसिकता कोणी बिघडविली ? कशी बिघडविली
? का बिघडली ? असा प्रतिप्रश्न केला.
सुरुवात तुम्ही शिक्षक म्हणून केली.
तेंव्हा तुमची मानसिकता काय होती..? तुम्ही
नोकरीला लागताना मुलांना फसवावे म्हणून गेले का ? पहिल्या दिवशी नोकरीला लागताना तुमची
चांगली मानसिकता होती ना ? मग आता शिक्षकाची मानसिकता का बिघडली ? कोणी बिघडविली.?
याचा नीट विचार करावा लागेल.
ü ढ मुलाचा
वर्ग
शिकलेला कोण जन्माला येते ? जन्माला
आलेले सर्वच रडत रडत येतात. न शिकणे हा निसर्गाचा नियम नाही. *'ढ'* मुले कुठे तयार
होतात ? शाळेत तयार होतात. मग याला जबाबदार कोण ? याचे विश्लेषण तुम्ही केले पाहिजे.
शिकणे हा निसर्गाचा नियम आहे. मूल का शिकत नाही. याला जबाबदार कोण ? त्या शिक्षकाची मानसिकता खराब कोणी केली ?
ü चला मग
तुमच्यापैकी असं कोण आहे ? ज्यांनी शिक्षकाची सकारात्मक मानसिकता तयार केली ?
१) आमचे
SLDP प्रशिक्षण झाल्यामुळे प्रत्येक मूल शिकू शकतं. असा विश्वास त्यांच्यात निर्माण
केला. आमचं केंद्र प्रगत आहे.
२) मी एका
शिक्षकाला केंद्रातील दुसऱ्या शाळेत घेऊन गेलो.
तिथे मुले कशी शिकत आहेत. याचे दृश्य दाखविले त्यानंतर त्या शिक्षकांनी माझ्याकडे
2 महिन्याचा कालावधी मागितला. व दोन महिन्यांत त्या शाळेत बदल दिसून आला. अशा प्रतिक्रिया
केंद्रप्रमुख यांनी व्यक्त केल्या.
ü शिक्षकाची
मानसिकता कशी बदलली ?
त्या केंद्रप्रमुखानी शिक्षकाला
प्रेरणा दिली व ज्या शाळेत मूल शिकत आहे तिथली अध्यापन पद्धत शिकायला लावली. योग्य
शिकवणारे शिक्षक बघा. शिक्षकाची मानसिकता खराब नव्हती तर कसे शिकवावे हे त्याला समजले
नव्हते. ? शिकवावे कसे हे तंत्र त्याला उमगले
म्हणून शिक्षकाची मानसिकता सकारात्मकतेत बदलली.
ü DED,
BED चा शिक्षणक्रम शिक्षकाला मुलांना कसे शिकवावे हे शिकवीत नाही
काही ded ,bed झालेले शिक्षक पॉवलो
चे सिद्धांत,स्किनर चे सिद्धांत सांगतात. हे सिद्धांत कुत्रा व माकड यांच्यावर प्रयोग
करून आकारास आले आहेत. हे वर्तनवादी विचार आहेत. वर्तनवादी विचारातून मूल
शिकत नाहीत. आपण तर माणसं आहोत. मूल ज्ञानाची
रचना स्वतः करतात. ज्ञानरचनावादी पद्धतीने
शिकतात. इथे तुमच्याशी चर्चा करताना मी ज्ञानरचनावादी
पद्धत वापरत आहे.
ü मुलाला
शिकविण्यासाठी काय करायची गरज आहे.
योग्य दिशेने प्रयत्न करण्याची
गरज आहे. मी नरिमन पॉईंट वरून पनवेलला यायचे आहे. अर्धा तास आल्यावर मला
बांद्रा दिसत होतं. तिथून पुढे आल्यावर बोरिवली
दिसत आहे. तर पनवेल अजून लांब आहे म्हणून, इथे गती वाढवायला हवी की वळायला हवे. वळलो
तर पनवेल लागेल, नाहीतर अहमदाबाद पोहचेल. इतकी मेहनत करून अहमदाबाद ला पोहचता येईल.
यावरून दिशा बरोबर नसेल तर परिणाम मिळणार नाही.तुमचे
शिक्षक राब राब राबतात. त्यांना दिशा द्यायची
गरज आहे.
ü दिशा बरोबर
आहे की नाही हे कसे कळते ?
माझे उद्दिष्ट काय आहे ? मला काय
करावे लागेल ? मला परिमाण मिळालेत का
? काम करून परिणाम येत असतील तर दिशा बरोबर
आहे. परिणाम येणार नसेल तर दिशा चुकली असे समजावे.
ü PWD विभाग
सोपा शिक्षण सोपा नाही.
रस्ता झाला तर गाढवलाही कळते पण
शिक्षण झाले हे सर्वांनाच नाही कळत. शिक्षण झाले हे सुज्ञ माणसाला कळते. मूल्यमापन
करता आले तरच कळते. त्यासाठी शिकण्याची व प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. मूल्यमापन करता
आले नाही तर शिक्षण झाले की नाही, हे समजणार नाही. किंवा तुमचे नियोजन योग्य दिशेने
चालले आहे हे कळणार नाही. यावरून दिशा चूक असेल तर नियोजन बदलण्याची गरज आहे.
ü हॉवर्ड
गार्नर चा मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत
सात प्रकारच्या पद्धतीने मूल शिकते.एखादा कवितेच्या
माध्यमातून शिकते. एखादा मूल गाणे,खेळ,व्याख्यान,संगीत,संख्या,व्यायामाच्या माध्यमातून
शिकेल. याचाच अर्थ शिक्षकांच्या समोरची काही मुले व्याख्यानातून शिकतील पण काहींना
वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल.
ü शरीराचा
उपयोग करून शिकणे.
शरीराचा वापर करून मुलाला शिकवीता
येते. यात मुलांना सुरुवातीला अर्थ कळत नाही. त्यानंतर मुलाला त्याचा अर्थ कळतो.
ü मेक
इन मेलोडी सारख्या कृती सर्वाना करता येतील ?
येत असतील तर शाळेत जाऊन करा. तुम्ही
अशा कृती करीत नाहीत म्हणून मुलं शिकत नाहीत. प्रत्येक केंद्रप्रमुखानी 2 मिनिटाचा
व्हिडिओ तयार करून पाठवायचा. मग मेलोडी करा किंवा मुलांसोबत कृती करून हातवारे करून
कृतीयुक्त व्हिडिओ तयार करून पाठवा. DIECPD ने सर्व व्हिडिओ चे संकलन करावे. शरीराचा
वापर करून गणितही शिकविता येईल. उदा: एकक व
दशक... भूगोल शिकविता येतो. तुम्ही असा विचार करा. खूप काही शिकविता येईल.
ü संख्या
पाहून चिकित्सक विचार करता येतो..
डेटा पाहून आपल्याला चिकित्सक विचार
करता येतो. हे सगळे फिगर योग्य असतील तर मूल्यमापन
करता येते असे समजते. Data आपले डोळे उघडतात. आदिवासी मुले शिकतात हा तात्विक भाग तुम्हाला
सांगितला. एकाच तालुक्यात केंद्र मागे पुढे असे दोन्ही प्रकार दिसत आहेत.
ü तालुका
मागे असेल तर जबाबदार कोण व केंद्र मागे असेल तर ?
तालुका मागे असल्यास गटशिक्षणाधिकारी
व केंद्र मागे असल्यास केंद्रप्रमुख जबाबदार आहेत.
ü कातकरी
मुले शिकतात का ?
या हॉल मध्ये कातकरी कोणी आहे का
? कातकरी मुलांना शिकविले आहे का ? कातकरी मूल शिकताना कोणी पाहिले आहे का ? कातकरी मुले का शिकत नाही.? *यामागे त्यांची बोलीभाषा हे कारण आहे.* त्यांची भाषा शिक्षकाने आत्मसात करणे व शिकणे आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या पातळीवर जाऊन शिकवावे लागेल.
असे केले तर कातकरी मुले सुद्धा शिकतात. असा अनुभव येईल.
ü शिक्षण
देणे हे मानवीय कारण
शिक्षण देणे ही मानवीय कारण आहे. शिक्षण न देणे हे ही मानवीय कारण आहे.
ü कुपोषण
व शिक्षण
कुपोषण कमी करण्यासाठी आईला योग्य
आहार दिला तर सुदृढ मुले जन्माला येतात. मात्र
शिक्षण प्रक्रिया तशी नाही. आईला शिकविले म्हणजे जन्मतः मूल शिकलेले येणार नाही. त्याला शिकवावे लागेल.
शिकलेले मूल जन्माला येणे हा निसर्गाचा नियम नाही. तसे निसर्गाचे डिझाईन नाही.
ü Scafolding
आधीच्या काळात क्रेन शिवाय 7 माळ्याची इमारत बांधायचे मग त्यासाठी
परांची बांधून मजूर तिथपर्यंत इमारत बांधायला येत होते. याचाच अर्थ पायरी पायरीने काम
करणे होय. यालाच इंग्रजीत scafolding असे म्हणतात.
पायरी पायरीने शिकविणे गरजेचे आहे.
vशिकण्याचे
मूलभूत सिद्धांत
·
मुर्ता कडून अमूर्ताकडे
मूल आई बोलायला शिकते तेव्हा त्याला
कोणतीही भाषा येत नाही. मुलं आईलाच का आई म्हणते? ते आईला आई बोलायला कसे शिकतात.?
मूल फक्त आई बोलते बाकीचे लोक वाक्य म्हणतात.
उदा : बघ रे आई आली. पुन्हा पुन्हा
आई शब्द मूल ऐकते. व बघते. आई (अमूर्त)
हा शब्द व व्यक्ती (मूर्त) दिसते. शब्द व व्यक्ती
यात समन्वय घालून मूल आई बोलायला शिकते. त्यावरून मूल आई बोलायला शिकते. आई शब्द शिकण्यासाठी
त्याच्या समोर आई हा शब्द नाही ठेवला जात. हा शब्द शिकण्यासाठी मुलाने डोळे व कान ही
दोन ज्ञानेंद्रिये वापरली. यालाच मुर्ताकडून अमूर्तकडे जाणे म्हणतात. हा शिकण्यातल्या पहिला सिद्धांत आहे.
·
सोप्याकडून कठीणाकडे
सोपे कठीण असे काहीही नसते. इंग्रजी
शिकणे सोपे आहे की कठीण आहे. इंग्लंडमध्ये
मेंढपाळ इंग्रजी बोलतो आणि इथे भारतात शिकलेल्याना इंग्रजी बोलायला अडचण येते.
मुर्ताकडून अमूर्तकडे,ज्ञाता
कडून अज्ञाताकडे, पूर्ण कडून अपुर्ण कडे, या सिद्धांताचा वापर करून इंग्लड इंग्रजी
बोलायला शिकतात.
v कातकरी
मुलाला शिकण्यासाठी टप्पे कोणते करता येतील ?
सर्व लोकांनी बसून विचार करा. त्याशिवाय
कातकरी मुलं नाही शिकणार. एक उदाहरण पाहू.
उदा: 95 % मुले हजर आहेत. 68 % मुलांना वाचता येते. 48 % भागाकार येते यावरून मुलांचे न शिकण्याचे मुख्य कारण काय
?
v शिक्षकांचा
भागाकार संबोध स्पष्ट नाही.
47 % शिक्षकांचा भागाकार संकल्पना
स्पष्ट नाही. तर 27% मुलांना वाचन संकल्पना स्पष्ट नाही. यावरून दोन्हीकडे अडचण आहे.
इथे 5% अनियमित मुलांची अडचण आहे. जिल्ह्याचे नियोजन करताना भागाकार,वाचन व अनियमित
मुलांना नियमित करणे असा प्राधान्य क्रम ठरवावे लागेल.
v प्रियदर्शनी
पार्कमधील किस्सा
100% उपस्थिती असलेल्या जिल्ह्यात
100% मुले वाचन करतात मात्र 75 % मुले भागाकार
करतात यामागचे प्रियदर्शनी पार्क मधील शिक्षिकेने अनियमितता हे कारण सांगितले. मग ही
शिक्षिका सत्य बोलते की असत्य ? जर 100% मुले
वाचन करतात व भागाकार 75% मुले करतात. यावरून
वाचन येण्यासाठी मुले नियमित असतात मग भागाकार येण्यासाठी मुले अनियमित कसे ? यावरून
त्या पार्कमधील शिक्षिका असत्य बोलते असे दिसते.
v Data आवश्यक
कोणी खरे बोलते किंवा खोटे बोलते
हे पाहण्यासाठी त्या जागी जावे लागते. असे
नसून Data असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. Data वरून कळते कोण खरे
बोलते की खोटे.
v प्राप्त
data पाहून जिल्ह्याचे नियोजन करा त्यासाठी शुभेच्छा
आपल्या कडे असलेल्या माहितीचा उपयोग करून जिल्ह्याचे नियोजन करा.
व उद्दिष्ट प्राप्तीसाठी कामाला लागा . आपण मुलांना शिकवू या त्यासाठी ही कौशल्ये वापरा.
v 21 व्या
शतकातील कौशल्ये
१) चिकित्सक विचार २) समस्या निराकरण ३) सहकार्य वृत्ती ४) सृजनशीलता
चिकित्सक विचार करा. चिकित्सक विचार केल्याने समस्या निराकरण
करता येते. त्यात इतर लोकांची मदत घेतली की उपाययोजना करू लागतो. त्यात नवा विचार जोडला की त्यातून नवं निर्मिती आकारास
येते. या चार कौशल्यांचा वापर केला तर रायगड जिल्ह्याची समस्या सुटेल.
® DIECPD पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.